कुंभमेळ्यात साधूंच्या वस्तूंवर चोरांचा डल्ला, 2.75 लाखांचा ऐवज लंपास

कुंभमेळ्यात साधूंच्या वस्तूंवर चोरांचा डल्ला, 2.75 लाखांचा ऐवज लंपास

  • Share this:

naski mela 3403 ऑगस्ट : कुंभमेळ्यामध्ये साधू-महंतासोबत, चोरही दाखल झाले आहे. साधुग्राम सेक्टर बी मधल्या हनुमान खालसा आखड्यात मध्यरात्री चोरी झाली. साधू खोलीत झोपले असताना चोरांनी साधूंच्या वस्तु चोरुन नेल्या आहेत. जवळपास दोन लाख 75 हजारांचा

ऐवज चोरांनी लंपास केल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये दोन लाख 65 हजारांची रोकड, लॅपटॉप आणि मोबाईलचा समावेश आहे.

कुंभमेळ्यासाठी हजोरो साधू - महंत नाशिकच्या तपोवन परिसरात उभारण्यात असलेल्या साधुग्राम मध्ये दाखल झाले आहे,त्या बरोबर चोरांनी ही आपला मोर्चा या भागाकडे वळवल्याचे दिसतंय. साधुग्राम सेक्टर बी मधील हनुमान खालसा आखड्यात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली. साधू खोलीत झोपले असल्याचे बघून चोरांनी साधुनच्या वस्तुंवर डल्ला मारला, 2 लाख 65 हजारांची रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल असा सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय.

शहराबरोबर साधुग्राम मध्ये 348 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तसंच या भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून,चोरी झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुले आरोप सापडत नसल्याची नामुश्की पोलिसांनी बोलून दाखवलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 3, 2015, 7:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading