मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू

मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू

  • Share this:

marthwada  artficial rain03 ऑगस्ट : नाशिकमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रयत्न फसला असला तरी दुष्काळाचं सावट असलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीच्या तयारी आता सुरू झालीये. अमेरिकेच्या एका संस्थेला हा कृत्रिम पाऊस पाडण्याचं कंत्राट देण्यात आलंय. यासाठी 90 दिवसांचा करार करण्यात येणार आहे.

राज्यात ज्या ठिकाणी पाणी असणारे ढग जमतील त्या ठिकाणी हे विमान जाऊन फवारणी करेल. या उपक्रमासाठी 27 कोटींचा खर्च येणार आहे. जवळपास 400 किलोमिटरच्या परिसरात 23 ते 40 मिलीमिटर पाऊस पाडला जाऊ शकतो. औरंगाबादमध्ये सी बँड नियंत्रण कक्ष उभे केले जाणार आहेत. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल. नैसर्गिकपणे पाऊस पडत राहिला तर हा प्रयोग थांबवला किंवा रद्द केला जावू शकतो. 1 ऑगस्ट रोजी हा पाऊस पाडण्याची योजना होती मात्र सी बॅन्ड रडार उशिरा पोहोचल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 3, 2015, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading