शेतकर्‍याला मारहाण करणारे पोलीस निलंबित

शेतकर्‍याला मारहाण करणारे पोलीस निलंबित

  • Share this:

beed farmar_police01 ऑगस्ट : बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात पीक विम्यासाठीची रांग मोडल्यामुळे मनोहर गंधाले या शेतकर्‍याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. आता या प्रकरणी मारहाण करणार्‍या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. पण पोलीस निरीक्षकावर मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.

अगोदरच भीषण दुष्काळाच्या छायेने ग्रासलेल्या बळीराजाला विमा भरण्यासाठी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाड़ा इथं घडली होती. विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकरी मनोहर अश्रुबा गांधले यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. हा सगळा प्रकार बँकेच्या समोर घडला, पण पोलिसांना अडवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. मराठवाड्यात यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. पण गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पीकं करपली. दुष्काळात सगळं हातचं गेलं. त्यामुळे दुष्काळामुळे विमा भरण्याची तारीख मनोहर गंधाले यांना पाळता आली नव्हती. विम्याची रांग मोडल्याने पोलिसांनी त्याना अमानुषपणे मारहाण केली होती. अखेर या प्रकरणी 2 दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

First published: August 1, 2015, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading