S M L

जळगावात 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2015 09:47 PM IST

जळगावात 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

31 जुलै : विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. या सधन जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. गिरणा परिसरातल्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या तालुक्यांमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 7 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

भडगाव तालुक्यातल्या शिंदी इथल्या वसंत पाटील या 30 वर्षांच्या तरुण शेतकर्‍यानं आत्महत्या केली. वसंतला 3 मुलं आहेत. कर्जबाजारीपणा, दुबार पेरणीचं संकट यामुळे वसंतने स्वतःच्या शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्यावर सोसायटीचं आणि खासगी कर्ज होतं. पाचोरा तालुक्यातल्या अंजनविहीरेच्या रतन पाटील (45) यानेही कर्जबाजारीपणा आणि दुबार पेरणीनंतरही जळालेली पिकं या नैराश्यातून शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. रतनवर सोसायटीचं कर्ज होतं. मात्र अल्पभूधारक शेतकरी असल्यानं त्याला पुरेसं कर्ज मिळालं नव्हतं. त्यामुळे बँकेकडं कर्ज मागितलं होतं. पण ते मिळालं नाही. शेतीसाठी पैसा नाही. मुलीच्या लग्नासाठी पैसा नाही आणि पैसे नसल्यामुळे मुलाला शिक्षण सोडावं लागलं. या सगळ्यांमुळे निराशेच्या गर्तेत गेल्याने रतननेही जीवन संपवण्याचा मार्ग निवडला.

Loading...
Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 09:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close