मुंबई-नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार - मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार - मुख्यमंत्री

  • Share this:

ÖêêËÖêêŸÖÖ¯ÖÖêy

31 जुलै : केंद्र सरकारच्या सहाय्याने मुंबई ते नागपूर सहापदरी सुपर एक्स्प्रेस वे बांधणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत केली. या महामार्गासाठी 30 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून महामार्गाचे काम 2019 पर्यंत पूर्ण होईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या सहा पदरी सुपर एक्स्प्रेस वेचं काम 2 टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून, यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त दहा तासांत करणे शक्य होणार आहे. तसंत या एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्ही, वायफाय सारख्या सेवा सुद्धा उपलब्ध करुन दिल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाची शहरे एकमेकांजवळ आणण्याच्या उद्देशाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटलं जात आहे.

गुन्हेगारीच्या प्रमाणात घट

राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत केला. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर निवेदन केलं. आकडेवारीच्या भरवशावर कायदा-सुव्यवस्था चालू शकत नाही. पण समोरून विरोधक आकडेवारीच्या बळावर आरोप करत असतील, तर मलाही आकडेवारीनेच उत्तर देणं भाग आहे, असं प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारीची टक्केवरी 32.6 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचं सांगितलं.

वर्षभरात पोलिसांची चांगली कामगिरी

तब्बल 31 वर्षांनंतर नागपूरमध्ये गुन्हेगाराला फाशी देण्यात आली. याकूबला फाशी दिल्यानंतर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहचणारी नाही याची खबरदारी घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही, हे राज्याच्या पोलिसांचे यश आहे. त्यांचे खच्चीकरण करण्याऐवजी कौतुक करायला हवं, असं फडणवीस म्हणाले.

मालवणी विषारी दारूकांड : गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी प्रयत्नशील

मुंबईच्या मालवणीत झालेल्या विषारी दारूकांडातील गुन्हेगारांवर 302 अंतर्गत गुन्हा नोंदविला असून गुन्हेगारांना फाशी देण्यासाठीच सरकार प्रयत्न करील, असं फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीआयडी करत आहे, पण काही जण माहिती लिक करून आरोपींना मदत करत आहे का असा प्रश्न पडतो, असा अप्रत्यक्ष आरोपही फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

शेतकर्‍यांसाठी जुन्याच योजनांचा पुनरुच्चार

याबरोबरच शेतीच्या विकासासाठी अनेक योजना त्यांनी सांगितल्या. जीवनदायी योजनेचा लाभ सर्व शेतकर्‍यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पाच वर्षांत 25 हजार कोटींचा कालबद्ध कार्यक्रम शेतीच्या विकासासाठी राबवला जाणार आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी विशेष योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विठ्ठल मंदिरातील पूजेच्या वादावर स्पष्टीकरण

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरच्या विठ्ठल मंदिरातील पूजेच्या वादावरदेखील मुख्यमंत्र्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे मंदिर समितीचे हंगामी अध्यक्ष असल्यामुळेच त्यांनी नियमानुसार पूजा केली. आम्हाला बाहेर उभं रहावं लागलं नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने जरा माहिती घेऊन बोलायला हवं होतं, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 09:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading