शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी भाविकांची गर्दी

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी भाविकांची गर्दी

  • Share this:

SONY DSC

30 जुलै : शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. तीन दिवस चालणार्‍या उत्सवास आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर सुरुवात झाली असून साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली असून उद्या मुख्य दिवस आहे. भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल होत आहेत. साईबाबांच्या भक्तांसाठी गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठे महत्त्व असून देश-परदेशातले साई भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात.

आज सकाळी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या हस्ते काकड आरती झाल्यानंतर गावातून साई प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढून उत्सवास प्रारंभ करण्यात आला. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवास 4 ते 5 लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त येणार्‍या भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सवाविषयी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी अधिक माहिती दिली.

Follow @ibnlokmattv

First published: July 30, 2015, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading