याकूबचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द, बडा कब्रस्तानमध्ये होणार दफन

याकूबचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द, बडा कब्रस्तानमध्ये होणार दफन

  • Share this:

yakub_memon_new_photo30 जुलै : याकूब मेमनला अखेर आज (गुरुवारी) नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आलंय. फासावर लटवल्यानंतर याकूबचा मृतदेह कुठे दफन केला जाणार यावरून संभ्रम निर्माण झाला. अखेर याकूबचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. 10.30 वाजेपर्यंत याकूबचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.

याकूबचा भाऊ सुलेमान मेमनने मृतदेह ताब्यात द्यावा अशी विनंती नागपूर प्रशासनाकडे अर्ज केला होता. मृतदेहाचं कुठल्याही पद्धतीनं प्रदर्शन करणार नाही. मजार किंवा स्मारक सदृश कोणतीही गोष्ट उभारली जाणार नाही अशी लेखी हमी सुलेमाननं दिलीय. या अटीवर हा मृतदेह देण्यात आहे. या लेखी हमीनुसार याकूबच्या कुटुंबियांची विनंती मान्य करण्यात आली.

नातेवाईक 11 च्या सुमारास विमानाने याकूबचा मृतदेह घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईत आल्यानंतर बडा कब्रस्तानमध्ये याकूबला दफन करण्याची शक्यता आहे. दरम्यान,नागपूर आणि मुंबई विमानतळावर आता अधिक सुरक्षा वाढवण्यात आलीये. तसंच मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया याकूबच्या माहिमच्या घरी पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. माहिममध्ये 2 दंगल विरोधी पथकंही तैनात करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: July 30, 2015, 9:42 AM IST

ताज्या बातम्या