याकूबची फाशी निश्चित... पण कधी?

याकूबची फाशी निश्चित... पण कधी?

  • Share this:

yakub_memon_new_photo29 जुलै :

फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी खटाटोप, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज, सुप्रीम कोर्टात धडपड, आजारी असल्याचं ढोंग अशा ना ना प्रयत्न करू पाहणार्‍या याकूब मेमनच्या फाशीचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. उद्या सकाळी सात वाजेपर्यंत याकूबला फासावर लटकवलं जाण्याची दाट शक्यता आहे.

1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी याकूब मेमन याच्या दयेचा अर्ज फेटाळावा असा अभिप्राय केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रपतींना पाठवलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती गृह मंत्रालयाचा सल्ला ग्राह्य धरणार आहेत.

21 जुलैला सुप्रीम कोर्टानं याकूबनं दाखल केलेली दुरुस्ती याचिका फेटाळली होती. त्याला तांत्रिक कारण देत याकूबनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं आज याकूबची दुरुस्ती याचिका पुन्हा फेटाळली, त्याला बजावण्यात आलेलं डेथ वॉरंट योग्य असल्याचा निर्वाळा दिला आणि आता त्याला पुन्हा दुरुस्ती याचिका दाखल करता येणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता याकूबला फाशी होणार हे स्पष्ट झालंय. गेल्या काही दिवसांपासून या खटल्यानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावरून राजकारणही बरंच झालं. याकूबनं राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलेला होता. त्यापैकी राज्यपालांनी याकूबच्या दयेचा अर्ज फेटाळला. त्यामुळे सर्व लक्ष राष्ट्रपतींच्या निर्णयाकडे आहे.

दरम्यान, खंडपीठाच्या या निर्णयापाठोपाठ महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनीही याकूबच्या दयेची याचिका फेटाळून लावलीये. त्यामुळे याकूब भोवती फास आणखी आवळला गेला आहे. राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे फाशी नक्की समजली जात आहे. उद्या सकाळी सातवाजेपर्यंत याकूबला फाशी दिला जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 29, 2015, 4:19 PM IST

ताज्या बातम्या