29 जुलै : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीवरून वाद सुरू आहे. आणि आता या वादात मुस्लीम आमदार आणि नगरसेवकांनी उडी घेतली असून याकूबची पाठराखण केलीये. याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधात काही मुस्लीम आमदार आणि नगरसेवकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवलंय. याकुबला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी या आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
माजी मंत्री नसीम खान, आमदार अमिन पटेल, आमदार अस्लम शेख, आमदार शेख असिफ शेख रशीद, मुझफ्फर हुसेन, हुसनाबानो खलीफ माजी आमदार युसूफ अब्रहानी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या या पत्रावर स्वाक्षर्या आहेत. हे पत्र राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलंय. या अगोदरही अभिनेता सलमान खानने याकूब ऐवजी टायगर मेमनला फाशी द्यावी असं वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर त्याने माफीनामा सादरही केला. पण, आता याकूबच्या बचावासाठी लोकप्रतिनिधीचं पुढे सरसावले आहे.
दरम्यान, याकूब मेमनची फाशी रद्द करण्याचं पत्र राष्ट्रपतींना देणार्या सहा आमदारांच्या विरोधात शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव आणलााय.
Follow @ibnlokmattv |