29 जुलै : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशीच्या शिक्षेपासून बचावासाठी धडपड सुरू आहे. याकूब मेमन गेल्या 9 वर्षांपासून नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगतोय. आजपर्यंत त्याचे अटक करण्यात आल्यानंतरचे फोटो पाहण्यास मिळतात. पण अलीकडचा याकूबाचा फोटो हाती लागलाय.
याकूबने जेलमध्ये राहून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेतलं. या विद्यापीठाच्या फॉर्मवरचा हा फोटो आहे. याकूबने डबल एमए केलंय. 2011मध्ये त्याने एमए इन पॉलिटिक्स केलं होतं. तर 2013मध्ये त्याने एमए इन इंग्लिश लिटरेचरची परीक्षा दिली. त्याची पदवी अजून त्याला मिळायची आहे. याकूबला 30 जुलैला फाशी झाली तर त्याला ती पदवी मिळणार नाही. विशेष म्हणजे याकूब हा चार्टर अकाऊंटट आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने डबल एमए केल्याचं समोर आलंय.
Follow @ibnlokmattv |