ठाकुर्ली इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ९ वर

ठाकुर्ली इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ९ वर

  • Share this:

thakurli building collapse29 जुलै : कल्याण- डोंबिवली परिसरातील ठाकुर्ली भागात मंगळवारी रात्री मातृकृपा ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा ९ वर पोहोचलाय. तर 14  जणं जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री साडे दहा ते 11 च्या सुमारास ही घटना घडली. मदतकार्य अजून सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाकुर्लीच्या चोळेगाव भागात मातृकृपा ही 43 वर्षं जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीत 20 कुटुंबं राहत होती. धक्कादायक म्हणजे पालिकेनं ही इमारत धोकादायक आहे असं जाहीरही केलं होतं. इमारतीच्या मालकांनीही रहिवाशांना इमारत सोडण्याचा इशारा दिला होता. दोन दिवसांपूर्वीच इमारतीच्या मागच्या बाजूला तडाही गेला होता. इमारत कोसळल्याचं समजताच पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलानं चोळेगावच्या दिशेनं धाव घेतली. पालिका प्रशासन, अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अजून काही रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येतोयत. जखमींवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 11:06 AM IST

ताज्या बातम्या