कलाम सरांच्या 'अग्निपंख'मधून...

कलाम सरांच्या 'अग्निपंख'मधून...

  • Share this:

kalam quts_new28 जुलै : डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे बहुआयामी व्यक्तीमत्व...ते शास्त्रज्ञ होते, ते लेखक होते...साहित्य, संगीत, पर्यावरणाची त्यांना आवड होती. कलाम यांचं 'विंग्ज् ऑफ फायर' अर्थात अग्निपंख हे पुस्तक प्रचंड गाजलं. अग्निपंख हे नुसते पुस्तक नसून तरुणांसाठी प्रेरणादायी जीवनपटच आहे. याच अग्निपंखमधील कलाम सरांचे बहुमुल्य विचार....

- "ही पृथ्वी देवाची आहे... हे अफाट असीम आकाश त्याचेच आहे... दोन्ही अमर्यादीत समुद्र त्याच्याच ह्रदयात शांत होतात...आणि तरीही लहानशा तळ्यातही तो असतो..."

- संकटं माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात...

- जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणं...

- क्षणापाठी क्षण जोडत दीर्घ दिवसभर खरे शौर्यानं प्रामाणिक प्रयत्नांनी श्रम करतात ते हात सर्वांगसुंदर असतात...

- काळाच्या किनार्‍यावर तुमची पावले उमटवायची असतील तर ती फरफटू नका...

- आयुष्य म्हणजे न सोडवलेल्या प्रश्नांची, समस्यांची सरमिसळ असते...

धुसर भासणारे विजय त्यात असतात अन् आकारहीन पराजयही...

- येणार्‍या प्रत्येक दिवसासाठी तयारीत रहा, त्यांना सारखंच सामोरं जा...

- जेव्हा ऐरण होशील... तेव्हा घाव सोस... अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल....

- जेव्हा शिष्य तयार असतो... तेव्हा गुरू प्रकट होतो...

- मनात नेहमी आशावदी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणावेत.

 त्यामुळं आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.

- चांगला विद्यार्थी सामान्य गुरूकडून जे मिळवू शकतो, ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरुकडून मिळवेल त्यापेक्षा अधिक असते.

- प्रत्येक कठीण, गुंतागुंतीची गोष्ट हळूहळू बदलत जाते, आणि शेवटी दुसर्‍या सोप्या गोष्टीत परावर्तीत होते.

- नव्या नव्या कल्पना निद्रीस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात, त्या जाग्या होतात, मुक्त होतात, त्यांना कष्टाचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो, तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते.

Follow @ibnlokmattv

First published: July 28, 2015, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading