मुंबईसह पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2015 02:50 PM IST

 मुंबईसह पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी

mumbai sidhivinyak3442327 जुलै : पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरील प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रालाही सतर्केतेचा इशारा देण्यात आलाय.

राज्यात मुंबई, पुणे,नाशिक आणि नागपूरमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूरमध्ये 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर आणखी कडेकोड बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज पंजाबमध्ये अतिरेक्यांनी गुरूदासपूर जिल्ह्यातल्या दीनानगर पोलीस स्टेशनवर पोलीस हल्ला चढवलाय. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात अजूनही चकमक सुरूच आहे.

5 दहशतवादी पोलीस स्टेशनमध्ये दबा धरून बसलेत. आतापर्यंत या हल्ल्यात 1 दहशतवादी ठार झालाय. तर 2 पोलिसांसह 3 नागरिकांचा मृत्यू झालाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2015 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...