दुष्काळाचं संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं

दुष्काळाचं संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं

  • Share this:

cm vitthal aarti27 जुलै :: आज आषाढी एकादशी...विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं अवघ्या महाराष्ट्रभरातून आलेले लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत. पंढरीमध्ये वारकर्‍यांची मांदीयाळी जमलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पहाटे पांडूरंगाची शासकीय महापूजा केली. राज्यावर आलेलं दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पांडूरंगाला साकडं घातलं.

बळीराजा हरीत क्रांती घडवत असतो. त्यामुळे बळीराजाला पाणी मिळालं पाहिजे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलंय. मुख्यमंत्र्यांसोबत पुजेची संधी मिळालेले यंदाचे मानाचे वारकरी ठरले हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खूर्दचं धांडे दाम्पत्य...राघोजी धांडे आणि संगीता धांडे या दाम्पत्याला हा मान मिळाला. त्यांचा जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीयही उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

First published: July 27, 2015, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading