‬ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल...अवघे गर्जे पंढरपूर...!!

‬ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल...अवघे गर्जे पंढरपूर...!!

  • Share this:

vitthal_wariदेव पाहावयासी गेलो

तेथे देवची होऊनी ठेलो

27 जुलै : 'विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी', अशी विठ्ठलनामाने दुमदुमणारी पंढरी आज लाखो नेत्रांनी पाहिली. चंद्रभागेत स्नान करून विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर 'याजसाठी केला होता अट्टाहास', अशी कृतार्थ भावना वारकर्‍यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात 12 लाख दाखल झालेल्या वारकर्‍यांनी अवघी पंढरी आज फुलून गेली.

पहाटेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पुजेची संधी मिळालेले यंदाचे मानाचे वारकरी ठरले हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खूर्दचं धांडे दाम्पत्य...राघोजी धांडे आणि संगीता धांडे या दाम्पत्याला हा मान मिळाला. त्यांचा जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी एकोणीस दिवसांची वारी करुन राज्यभरातले भाविक पंढरपुरात दाखल झाले. अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरानं दुमदुमलीय. प्रत्येक रस्त्यावर वारकर्‍यांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. विठुरायाच्या दर्शनानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी वारकर्‍यांनी गर्दी केली. टाळ-मृदुंगाच्या साथीनं पावली करत मंदिराभोवती प्रदक्षिणा वारकरी घालत होते. भक्तांची रिघ मंदिर परिसरात पहायला मिळतेय. रविवारी संध्याकाळी सर्व प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरचं वातावरण 'अवघा रंग एक झाला...' असं होऊन गेला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 27, 2015, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading