26 जुलै : याकूब मेमनच्या फाशीविरोधातील ट्विटमुळं टीकेचा धनी ठरलेल्या सलमानवर सर्व स्तरातूर टिकेची झोड उठवली जात असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमानचा जामीन रद्द व्हावा, अशी मागणी केली आहे. या मागणीचे पत्रही शेलार यांनी राज्यपाल सी.व्ही. राव यांना पाठवले आहे.
Submitted a letter 2 Governor Rao ji, 2 request cancellation of bail of convicted Salman khan for supporting convict! pic.twitter.com/t6vLESYoxE
'सलमान खान हा स्वत: दोषी असून त्याची दुसर्या दोषीची शिक्षा माफ करण्याची मागणी आहे, यातून सलमानने सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे' असं शेलार यांनी म्हटलं आहे. सलमान खानला सुप्रीम कोर्ट आणि कायद्याबाबत आदर नाही. एकप्रकारे सलमान खान गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करायला हवा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
'याकूबच्या ऐवजी टायगरला फाशी द्या,' असं सांगणारी तब्बल 14 ट्विट्स काल मध्यरात्री सलमाननं केली होती.