याकूब ऐवजी टायगर मेमनला फाशी द्या - सलमान खान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2015 12:33 PM IST

याकूब ऐवजी टायगर मेमनला फाशी द्या - सलमान खान

salman_khan on yakub

26 जुलै : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यानंतर आता अभिनेता सलमान खानही याकूब मेमनसाठी धावून आला आहे. एका निष्पाप फाशी देणं म्हणजे मानवतेची हत्या असून, याकूबच्या ऐवजी टायगर मेमनला फाशी द्यावी, अशी मागणी अभिनेता सलमान खानने केली आहे.

Loading...

याकूबच्या फाशीसंदर्भात सलमानने काल मध्यारात्री पाऊणे दोन ते पाऊणे तीनच्या सुमारास ट्विटवर त्याचे मत मांडले. सलमाननं एका तासात तब्बल 14 ट्विट केलं आहेत.

याकूबच्या फाशी प्रकरणात त्याचे कुटुंबिय देखील भरडले जात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मला याकूबच्या फाशीवर बोलायचे होतं. याकूबऐवजी भारतातून पळून गेलेल्या टायगरला फाशी द्यावी अशी मागणी त्याने केली. टायगर पाकमध्ये असेल तर नवाझ शरीफ यांनी त्याला भारताकडे सुपूर्त करावे असंही त्याने म्हटलं आहे.

 

दरम्यान, सलमान खानच्या या ट्विटवर विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सलमानने न्यायालयाचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली आहे. सलमान खानने अशाप्रकारचे ट्विट करून न्यायालयाचा अवमान केला आहे. त्याने तात्काळ याकूब विषयीचे हे ट्विट मागे घ्यावे, अशी नाराजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2015 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...