IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पुराव्याअभावी श्रीशांत, अंकित चव्हाण दोषमुक्त

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पुराव्याअभावी श्रीशांत, अंकित चव्हाण दोषमुक्त

  • Share this:

ipl spot fixing_blog25 जुलै : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटला काळीमा फासणार्‍या खेळाडूंची निर्दोष सुटका झालीये. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाणाची पुराव्या अभावी दिल्ली पटियाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केलीये. दिल्ली पटियाला कोर्टाच्या या निर्णयामुळे दिल्ली पोलिसांना मोठा झटका बसलाय.

आयपीएलच्या सहाव्या हंगामात दिल्ली पोलिसांनी संपूर्ण पुराव्यानिशी राजस्थान रॉयलचे खेळाडू श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा केला होता. या प्रकरणी श्रीशांत, अजित आणि अंकितला पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबत 11 बुकींनाही ताब्यात घेतलं होतं. 11 बुकींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या तिन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये कोणत्या ओव्हरमध्ये किती धावा द्यायच्या आणि कशा द्यायच्या असं ठरलं होतं. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तीनही खेळाडूंचे फोन टॅप केले होते. त्यानंतर स्पॉट फिक्सिंगची शहानिशा झाल्यानंतर अटकेची कारवाई केली होती.

या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पैसा असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. अखेर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यात दाऊदसह तिन्ही खेळांडूना आरोपी केलं होतं. आज शनिवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. कोर्टाने पुराव्याअभावी सर्व 16 आरोपींची निर्दोषमुक्ता केली. कोर्टाच्या या निर्णयामुळे दिल्ली पोलिसांना झटका बसला तर खेळाडूंना मोठा दिलासा मिळालाय. एकाप्रकारे पुन्हा एकदा खेळाडूंना मैदान मोकळे झाले आहे.

असं झालं होतं स्पॉट फिक्सिंग

अजित चंडिलाची फिक्सिंग

5 मे रोजी जयपूरमध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजित चंडिलानं पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला. चांदिलियाच्या स्पेलमध्ये दुसर्‍या ओव्हरमध्ये अजित 20 रन्स देणार हे ठरलं होतं आणि त्यासाठी किंमत 20 लाख पक्की झाली होती. पण या मॅचमध्ये अजित चांदिलियानं ठरलेली खूण ओव्हरअगोदर बूकीजना दिली नाही त्यामुळे या मॅचचे पैसे अजित चांदिलियाकडून बूकीजनं परत मागितले होते.

– 5 मे 2013, जयपूर

– राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स

– दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 20 लाख रुपये

– बूकीजना खूण दिली नाही, त्यामुळे बूकीजनं पैसे मागितले परत

श्रीसंतची फिक्सिंग

9 मे रोजी मोहालीमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. श्रीसंतनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं मान्य केलं होतं. त्यासाठी त्यानं आपण टॉवेल आपल्या पँटला लावू ही खूण ठरवली होती.

– 9 मे 2013, मोहाली

– राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

– पँटमध्ये टॉवेल लावण्याची ठरली होती खूण

अंकित चव्हाणची फिक्सिंग

तर 15 मे रोजी मुंबईमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांदिलियानं अंकित चव्हाणला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडलं होतं.

– 15 मे 2013, मुंबई

– राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

– दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 60 लाख रुपये

– अजित चंडिलानं अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगसाठी केलं तयार

Follow @ibnlokmattv

First published: July 25, 2015, 6:18 PM IST

ताज्या बातम्या