News18 Lokmat

इगतपुरीमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलीची बलात्कार करून हत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2015 07:58 PM IST

rape sds22 जुलै : इगतपुरीमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. इगतपुरी तालुक्यातल्या कुरुंगवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या मुलीचे कुटुंब गरीब आणि अशिक्षित आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं त्यांनी मुलीच्या पार्थिवावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. मुलीच्या हत्येनंतरही आरोपीची अरेरावी सुरू राहिल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर 5 दिवसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी उकरून काढण्यात आला. आरोपी रामदास मेगाळ याला घोटी पोलिसांनी अटक केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह मागील शनिवारी घराजवळील झुडपात आढळून आला होता. मुलीचे घरातील अशिक्षित असल्या कारणाने संबंधित आरोपीने गावात वाच्यात केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यानं अंत्यसंस्कारही गुपचूप उरकून घेण्यात आला होता. मुलीच्या हत्येनंतरही आरोपीची अरेरावी चालूच असल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी घोटी पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पाच दिवसांनंतर या प्रकाराला वाचा फुटली. आरोपी रामदास मेगाळ हा कुरुंगवाडी गावातील असून त्यानंच अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचं मुलीच्या आजीने सांगितलं. आज पोलिसांच्या मदतीने पाच दिवसांनंतर मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जमिनीतून बाहेर काढण्यात आला. आरोपी रामदास मेगाळ याला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास घोटी पोलीस करत असल्याचं पोलिस उप अधीक्षकांनी सांगितलंय. पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून नाशिक येथील लॅबमध्ये नमुनेही पाठवण्यात आले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 07:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...