याकूब वाढदिवसाच्या दिवशीच फासावर !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2015 06:35 PM IST

याकूब वाढदिवसाच्या दिवशीच फासावर !

yakub nagpur jail444

21 जुलै : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य दोषी याकूब मेमनला आता फाशी होणार हे निश्चित झालंय. फाशी निश्चित झाल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात हालचालींना वेग आलाय. 30 जुलैपर्यंत कधीही याकूबला फासावर लटकवलं जाणार आहे. तसा डेथ वारंटच निघालाय. विशेष म्हणजे याकूबची जन्मतारीख ही 30 जुलै 1962 आहे जर याकूबला 30 जुलैला फासावर लटकावले तर जन्मदिवशीच त्याचा मृत्यू होईल.

याकूब मेमननच्या फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशम सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने नागपूर मध्यवरमधील हालचालींना वेग आला आहे. याकूबचा भाऊ उस्मान आणि त्याचे वकील शुबेल फारुकने याकूबची भेट घेतली. 30 जुलैपर्यंत कधीही याकूबला फाशी देण्यात येईल असं डेथ वारंटमध्ये सांगणात आलं आहे.

30 तारखेला सात वाजेपर्यंत फाशी दिली जाईल. फाशीच्या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. जेलमधील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. 30 तारखेला याकुबला सकाळी 3 वाजता उठवलं जाईल. आंघोळ करण्याची परवानगी दिली जाईल. नंतर पवित्र धर्मग्रंथ वाचायला दिले जातील. आपल्या गुन्ह्याबद्दल त्याला दिलेली शिक्षा सांगितली जाईल. शेवटची इच्छा विचारली जाईल आणि नंतर फाशी दिली जाईल.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...