'नागपूर जेलवर जर अतिरेकी हल्ला झाला तर पोलिसांकडे बंदुकाही नाही'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2015 04:28 PM IST

nagpur central jail21 जुलै : 1993 साखळी स्फोटातील दोषी याकूब मेमनला 30 जुलैला फाशी देण्याच्या निर्णयानंतर आजतागायत नागपूरच्या सेंट्रल जेलची सुरक्षा थोडीही वाढवण्यात आली नसल्याच गौप्यस्फोट सेंट्रल जेलचे निलंबित जेल अधिक्षक वैभव कांबळे यांनी केला आहे.

याकूब मेमनला फाशी देण्याच्या आदेशानंतर नागपूर सेंट्रल जेलवर एखादा अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता असतांनाही असा हल्ला परतवण्यासाठी साध्या बंदुकाही जेलच्या कर्मचार्‍यांकडे नसल्याचं कांबळे यांनी सांगितलंय.

तसंच नागपूरच्या सेंट्रल मधून पाच कैदी फरार झाल्यानंतरही कुठलीही सुरक्षा अद्याप वाढवण्यात आली नसल्याच वैभव कांबळे यांनी सांगितलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...