याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्ट आज देणार निकाल

याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्ट आज देणार निकाल

  • Share this:

YakubAbdulRazakMemon_b

21 जुलै : 1993च्या मुंबई बाम्बस्फोट हल्लाप्रकरणी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा, यासाठी याकूब मेमनने दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात दोषी आढळल्याने कोर्टाने याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली. सध्या तो नागपूर सेंट्रल जेलमध्ये असून, त्याला तिथेच फाशी देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पण, याकूबच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने जर मेमनची याचिका फेटाळून लावली तर त्याला 30 जुलैला नागपूर जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येईल.

त्याआधीच फाशीची तारीख का निश्चित करण्यात आली, असा सवाल अनेकांनी विचारला होता. त्यावर बराच वादही झाला होता. अखेर मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. असे आदेश दिलेलेच नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं.

दरम्यान, याकुब मेमनला 30 जुलैला फाशी देण्याच्या निर्णयानंतर आजतागायत नागपूरच्या सेंट्रल जेलची सुरक्षा थोडीही वाढवण्यात आली नसल्याच गौप्यस्फोट सेंट्रल जेलचे निलंबित जेल अधिक्षक वैभव कांबळे यांनी केला आहे. याकुब मेमनला फाशी देण्याच्या आदेशानंतर नागपूर सेंट्रल जेलवर एखादा अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता असतांनाही असा हल्ला परतवण्यासाठी साध्या बंदुकाही जेलच्या कर्मचार्‍यांकडे नसल्याच कांबळे यांनी सांगितले आहे. तसंच नागपूरच्या सेंट्रल मधून पाच कैदी फरार झाल्यानंतरही कुठलीही सुरक्षा अद्याप वाढवण्यात आली नसल्याच वैभव कांबळे यांनी सांगितले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 21, 2015, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading