येरे येरे पावसा,येत्या 72 तासांत मुसळधार बरसण्याची शक्यता

येरे येरे पावसा,येत्या 72 तासांत मुसळधार बरसण्याची शक्यता

  • Share this:

20 जुलै : गेल्या काही दिवसांपासून वरुणराजे रुसल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय. अखेर आज (सोमवारी ) मुंबईत पावसाने कमबॅक केलंय. पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्यानेही येत्या 48 ते 72 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

mumbai rain 20 june 15 (23)जूनमध्ये मान्सूनने सर्वत्र हजेरी लावल्यामुळे गारेगार दिलासा मिळाला होता. मात्र, जुलै महिना संपत आला तरी पाऊस न बरसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भात दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. विदर्भात पिकांचं नुकसान आणि कर्जबाजारपणाला कंटाळून शेतकर्‍यांना आत्महत्या केलीये. जुलैमहिन्याच्या अखेरीस पावसाने कमबॅक केल्याचं चिन्ह आहे. आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झालीये. मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावलीये. त्यामुळे ऐन सकाळी चाकरमान्याची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. हवामान खात्यानेही राज्यात मान्सूनचं पुनरागमन लवकरच होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  येत्या 48 ते 72 तासांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामानखात्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

First published: July 20, 2015, 11:57 AM IST

ताज्या बातम्या