धक्कादायक! मुंबईत वर्षभरात 30 हजार महिलांचा गर्भपात

धक्कादायक! मुंबईत वर्षभरात 30 हजार महिलांचा गर्भपात

  • Share this:

2012-1_LT-Abortion

17 जुलै : मुंबईत गर्भपाताचं प्रमाणात धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत दिली. ऑनलाईन उपलब्ध होणार्‍या औषधांमुळे मोठ्या प्रमाणात गर्भपात होत असल्याचं उघड झालं आहे.

मुंबईत गेल्या वर्षभरात 30 हजार महिलांनी गर्भपात करून घेतला आहे. यात 15 वर्षांखालील 185 मुलींनी गर्भपात केल्याची नोंद असून 19 वर्षांखालच्या 1600 मुलींनी गर्भपात करून घेतल्याची धक्कादायक आक़डेवारी खडसेंनी आज विधानसभेत सांगितली.

इंटरनेटवरून जाहीरात करून उत्तेजक गोळ्या आणि गर्भनिरोधक औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. अन्न औषध विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी खडसेंनी दिल्या आहेत. इंटरनेटवरून औषधांची विक्री करणार्‍या ज्या कंपन्यांची कार्यालयं देशाबाहेर आहेत, त्यांच्यावर कशी कारवाई करायची याची माहितीही केंद्राकडून घेतली जाणार आहे. तर ऑनलाईन औषधं विकणार्‍या स्नॅपडील आणि शॉपक्लूज डॉट कॉम सारख्या वेबसाईट्वर कारवाई करणार असल्याची माहिती खडसेंनी आज सभागृहात दिली. याशिवाय प्रिस्क्रीप्शन शिवाय किट विकणार्‍या फार्मासिस्टचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असल्याचंही खडसेंनी सांगितलं.

यासंदर्भातला कायदा केंद्राचा आहे. त्यामुळं कारवाईसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच याबाबत कठोर कायदा करून कडक कारवाई करावी अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचीही माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 07:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading