'माऊलींच्या मुक्कामाच्या दिवशी पशुहत्या करणार नाही'

'माऊलींच्या मुक्कामाच्या दिवशी पशुहत्या करणार नाही'

  • Share this:

lonad17 जुलै : पंढरपूरची वारी, कुंभमेळा आणि मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान ईद...असा सामाजिक उत्सवाचा तिहेरी संगम जुलै महिन्यात जुळून आलाय. याच निमित्ताने लोणदमध्ये मुस्लीम बांधवांनी घेतलेला निर्णय खरंच बंधुभाव जपण्याचं प्रतिकच आहे. माऊलींची पालखी जोपर्यंत लोणंदमध्ये तोपर्यंत पशुहत्या करणार नाही आणि ईद दुसर्‍या दिवशी साजरी करणार असा कौतुकास्पद निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतलाय.

आज, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे. शनिवारी ज्या दिवशी पालखी लोणंदहून मार्गस्थ होणार त्या दिवशी रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा सण आहे.

पालखीचं स्वागत करण्याकरता आणि बंधुभाव जपण्याकरता पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय लोणंदमधल्या मुस्लीम बांधवांनी घेतलाय. त्याबरोबरच रमजान ईदही शनिवारी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय.

शनिवारची ईद रविवारी साजरी कऱणार असा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. लोणदच्या मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी अशीच ही घटना आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 17, 2015, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading