फिल्मी स्टाईल दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 4 लाख लुटले

फिल्मी स्टाईल दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 4 लाख लुटले

  • Share this:

nagar bank16 जुलै :पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाघोली इथं अशोक सहकारी बँकेतून एका दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवून 4 लाख रुपये लंपास केले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.

तो आला...त्याने बंदूक दाखवली...आणि 4 लाख घेऊन पसारा झाला. एखाद्या सिनेमात घडावा असा प्रसंग वाघोली इथं घडलाय. या दरोडेखोरानं अशोक सहकारी बँकेत प्रवेश केला आणि मॅनेजरला बंदुकीचा धाक दाखवत 4 लाख रुपये देण्यास भाग पाडलं. पैसे मिळाल्यानंतर आपल्याला कुणी पकडू नये म्हणून दरोडेखोराने बँक मॅनेजरलाच बंदुकीचा जोरावर मोटारसायकलवर बसवलं आणि बँक मॅनेजरसकट रोकड घेऊन पसार झाला. वाघोलीतून बाहेर पडल्यानंतर त्यानं मॅनेजरला यवतमध्ये सोडून दिलं. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 16, 2015, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading