नासाचं अवकाश यान प्लुटोपासून अवघ्या काही अंतरावर

नासाचं अवकाश यान प्लुटोपासून अवघ्या काही अंतरावर

  • Share this:

CJ1gpCIW8AUCLgV

नासाचं न्यू होरायझन हे अवकाश यान प्लुटो या सूर्यमालेतल्या नवव्या आणि सर्वात लांबच्या ग्रहाच्या आता जवळ पोहोचला आहे. या यानाने पाठवलेल्या छायाचित्रांतून प्लुटोच्या आकाराबद्दलचा वाद आता दूर झाला आहे. आतापर्यंत प्लुटोचा आकार जितका सांगितला जात होता, त्यापेक्षा प्लुटो आकाराने खूपच मोठा ग्रह आहे.

प्लुटोचा व्यास 2 हजार 370 किलोमीटर असल्याचं आता निश्चित झाला आहे. 1930 मध्ये प्लुटोचा शोध लागल्यापासून त्याच्या नेमक्या आकाराबद्दल वाद सुरू होता. आता या वादावर पडदा पाडण्यात यश आल्याची प्रतिक्रिया शास्त्रज्ञांनी दिली आहे. सध्या न्यू होरायझन हे यान सेकंदाला 14 किलोमीटर या वेगानं प्लुटोच्या दिशेनं झेपावतं आहे. गेल्या नऊ वर्षांपासून न्यू होरायझन प्लुटोच्या दिशेनं प्रवास करतं आहे. आतापर्यंत त्यानं 3 अब्ज मैलाचं अंतर कापलं आहे. निक्स आणि हायड्रा हे प्लुटोचे चंद्र आहेत. हबल दुर्बिणीतून यांचा 2005 मध्ये शोध लागला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading