धावत्या लोकलमधून युवकाला फेकले

  • Share this:

333mumbai_local_13 जुलै : मुंबईत एका युवकाला धावत्या लोकलमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेत युवक जखमी झाला आहे आणि त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अब्दुल शेख असं त्याचं नाव आहे.

अब्दुल शेख मुंब्रा इथून गोवंडीला जात होता. त्यानं कुर्ल्याला ट्रेन बदलली आणि तो पनवेल ट्रेनमध्ये बसला. टिळकनगर स्टेशनमधून ही ट्रेन सुटल्यानंतर काही युवक डब्यामध्ये शिरले. त्यांनी अब्दुलला मारहाण केली आणि चालत्या ट्रेनमधून त्याला खाली फेकले, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. मात्र, त्या युवकांनी अब्दुलला मारहाण करण्याचं कारण समजू शकलं नाही.

Follow @ibnlokmattv

First published: July 13, 2015, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading