पासपोर्ट आता सात दिवसांत मिळणार, पोलीस पडताळणी होणार ऑनलाईन

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2015 03:07 PM IST

पासपोर्ट आता सात दिवसांत मिळणार, पोलीस पडताळणी होणार ऑनलाईन

13 जुलै : नवीन पासपोर्ट किंवा पासपोर्ट नुतणीकरणासाठी आता 20 दिवसांची वाट पाहण्याची आवश्यकता नसून अवघ्या सात दिवसांत पासपोर्टात हातात पडणार आहे. पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी ऑनलाईन करून सध्याची पडताळणी रद्द करण्याचा गृह मंत्रालय विचार करत आहे.

पासपोर्ट मिळवताना अर्जदारावर कोणते गुन्हे दाखल तर नाही, अर्जदाराची माहिती खरी आहे की नाही याची पडताळणी पोलिसांकडून केली जाते. या प्रक्रियेसाठी पोलिसांना अर्जदाराच्या घरी जावून चौकशी करावी लागते किंवा विभागवार पोलीस स्टेशनमध्ये अर्जदाराला हजर राहावं लागतं. पण आता ही प्रक्रिया अधिक सोपी करणाचा सरकारचा मानस आहे. पासपोर्ट मिळण्यासाठी पोलीस पडताळणी लवकरच रद्द होऊ शकते. गृह मंत्रालय या प्रस्तावावर विचार करतंय. पोलीस पडताळणी ऐवजी प्रत्येक पोलीस अधीक्षकाकडे आधार कार्ड आणि national population register चा डेटाबेस उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज केलात, आणि तुमचं आधार कार्ड असेल, तर पोलीस त्यांच्याच पातळीवर तुमची पडताळणी करतील, आणि ना-हरकत प्रमाणपत्र पुढे पाठवतील. त्यामुळे पोलीस पडताळणीचा फेरा वाचणार असून पासपोर्ट सात दिवसांत हाती पडणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2015 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close