मराठवाड्यावर 'पाणी'बाणीचं संकट !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2015 01:21 PM IST

Image img_222862_jaikwadaj_240x180.jpg13 जुलै : मराठावाड्यासह राज्यभर पाऊस नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. खास करून आधीच दुष्काळाचा सामना करणार्‍या मराठवाड्याची अवस्था बिकट होण्याची शक्यता असून 'पाणी'बाणीचं संकट ओढावणार आहे.

पावसाच्या भरवश्यावर जवळपास 70 टक्के खरीपाची पेरणी झालीये. मात्र, अंकुरलेली पिकं आता सुकून जाण्याची भीती आहे. अंकुरलेली पिकं जगवण्यासाठी पाण्याची साठेही आता नाममात्र शिल्लक राहिले आहे.

शेवटची आशा असलेल्या जायकवाडी धरणातही केवळ एक टक्क ा उपयुक्त साठा उरलाय. तोही येणार्‍या दहा दिवसात संपेल. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 105 मि.मि.पाऊस पडलाय. 50 टक्के तालुक्यांमध्ये तर केवळ 45 टक्के पाऊस पडलाय. संपूर्ण मराठवाड्यात आज घडीला उपयुक्त पाण्याचा साठा केवळ 9 टक्के राहिलाय.

मराठवाड्यातला पाणीसाठा

जायकवाडी, औरंगाबाद - 1 टक्के

Loading...

माजलगाव, बीड - केवळ 3 टक्के

बिंदूसरा, बीड - केवळ 2 टक्के

निम्न तेरणा, लातूर - 1 टक्के मृत साठा

मांजरा, लातूर - केवळ 4.46 टक्के

परभणी - केवळ 5 टक्के

नांदेड --17.52 टक्के

हिंगोली--35 टक्के

उस्मानाबाद - केवळ 3 टक्के

जालना--7.29 टक्के

उस्मानाबाद कोरडाच !

सलग 5 वर्षांपासून पावसाची वाट बघणारा उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जुलै महिना मध्यावर आला पण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आजपर्यंत इथं फक्त 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालीये. पेरणीची कामं 35 टक्के पूर्ण झालीयेत. सोयाबीनची पेरणी करून महिना लोटला तरी पावसाच्या पाण्याअभावी पिकाची म्हणावी तसी वाढ झाली नाही. त्यातून हताश होवून शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पेरलेलं सोयाबीन मोडून टाकायला सुरवात केलीये. अपेक्षेपेक्षा खूप कमी उत्पन्न मिळणार असल्यामुळे शेतकरी हताश झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2015 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...