'कुंभमेळ्यासाठी सरकारकडून निधी अपुरा, पालिकेनंच केली कामं'

'कुंभमेळ्यासाठी सरकारकडून निधी अपुरा, पालिकेनंच केली कामं'

  • Share this:

raj_nashik43511 जुलै : नाशिक दौर्‍यावर असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्याप्रमाणात निधी यायला हवा होता तो आलेला नाही, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेनेच कुंभ मेळ्यासाठी विकासाची कामं केलेली आहेत असा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे.

पालिकेच्या निधीतूनच विकासकामं सुरू आहेत. त्यामुळे नाशिकचा विकास आता दिसायला लागलाय. मला झोडणार्‍यांनी शहराचा विकास बघावा असा खोचक टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय.

साड़े तीन वर्षांत नाशिकचा विकास झालाय, त्याबद्दल मी समाधानी आहे. गोदापार्क बॉटेनिकल गार्डन, आयलंड झालंय. पण, जनता आहे की, नाही माहिती नाही असंही राज ठाकरे म्हणाले. शहरात ट्रॅफिक प्रश्न बिकट आहे या बाबत पार्किंगच्या जागांचे नियोजन केलं जात आहे. पण आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करून पालिकेनं रस्ते आणि पूल बांधले आहेत असा दावाही राज ठाकरेंनी केलाय.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे. 2375 कोटी रुपयांपैकी 75 टक्के रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकारने आधीच दिलेली आहे असं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 11, 2015, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading