मुंबईत 7/11 साखळी बॉम्बस्फोटाला 9 वर्ष पूर्ण

मुंबईत 7/11 साखळी बॉम्बस्फोटाला 9 वर्ष पूर्ण

  • Share this:

train-blast 11 july11 जुलै : मुंबईमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला आज 9 वर्ष पूर्ण झाली. 11 जुलै 2006 च्या दिवशी लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब स्फोट मालिका घडली होती. त्या बॉम्ब स्फोटात शेकडो लोक ठार झाले होते. सात ठिकाणी हे बॉम्ब ब्लास्ट झाले होते. या घटनेला आता 9 वर्षं पूर्ण होतायत.

11 जुलै 2006 .. वेळ संध्याकाळ सहाची... त्या दिवशी मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकल ट्रेन्समध्ये मध्ये 7 बॉम्बस्फोट झाले. शहराला आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना होती. या प्रकरणात आता पर्यंत एटीएसने 13 जणांना अटक केलीय. त्यांच्या मुंबई सेशन कोर्टात खटला सुरू आहे. सुरुवातीला अटक झालेल्या आरोपींनी अनेक गोष्टींसाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे हे प्रकरण लांबलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून हा खटला नियमित सुरू आहे. याप्रकरणात एटीएसच्या तेव्हाच्या अधिकार्‍यांनी

- कमाल अन्सारी

- डॉक्टर तन्वीर

- एहतेशाम सिद्दिकी

- मोहम्मद अली

- वादिज

- वाहिद्दीन मोहम्मद

- मुझम्मिल

- फैझल

- आसिफ बशीर शेख

अशा 13 जणांना अटक केलीय. पण प्रत्यक्षात तेे तिथे नव्हतेच असा त्यांच्या वकिलांचा दावा आहे.

या प्रकरणात आतापर्यंत सरकारी पक्षाने सर्व साक्षी पुरावे कोर्टासमोर मांडले आहेत. आता आरोपीच्या वतीने साक्षी पुरावे कोर्टासमोरं मांडण सुरू आहे. मुंबईत आता पर्यंत अनेक बॉम्बस्फोट झालेत. पण इतर कोणत्याही प्रकरणात एवढी कोर्टकचेरी झाली नाही. त्यामुळे नऊ वर्षांनंतरही हे प्रकरण सुनावणी स्तरावरच रखडलंय.

Follow @ibnlokmattv

First published: July 11, 2015, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading