पोलिसांच्या समोर 'ती'चं अपहरण करून पुन्हा केला बलात्कार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2015 01:38 PM IST

पोलिसांच्या समोर 'ती'चं अपहरण करून पुन्हा केला बलात्कार

jalna police411 जुलै : जालन्यात पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा कळस झाल्याची घटना समोर आलीय. बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यासाठी बलात्कार झालेल्या मुलीचा पोलिसांनी सावजा सारखा वापर केला. मात्र, पोलिसांचा हा प्रयोग फसला आणि आरोपींनी या मुलीला पुन्हा पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळं पोलीस खात्यासह जिल्हाप्रशासनाला धक्का बसलाय. दोषी पोलीस अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करण्यात आलंय.

घडलेली हकीकत अशी आहे की, मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीवर धाक दाखवून दोन आरोपींनी बलात्कार केला. आणि बलात्काराचे मोबाईलवर चित्रिकरण केले. मुलीच्या आईकडं आरोपींनी खंडणीची मागणी केली. मात्र, आईनं पोलिसांत तक्रार केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

त्यांनी पीडित मुलीला आरोपींना फोन करायला लावला आणि भेटायला बोलावलं. सांगितलेल्या ठिकाणी ही मुलगी एकटीच पोहोचली . पोलीस थोड्या अंतरावर उभे राहिले. पण आरोपींनी पोलीस उभे असलेल्या रस्त्यांवरून न जाता शेतातल्या रस्त्यावरून या मुलीला पळवून नेलं आणि पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार केला. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलय. मात्र, पीडितेला सावजासारखं वापरून तिच्यावर पुन्हा बलात्काराला पोलीस कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे दोषी पोलिसांची तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2015 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...