पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016ला पाकिस्तानात जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016ला पाकिस्तानात जाणार

  • Share this:

223narendra modi and nawaz sharif

10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तानाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींना 2016 मध्ये होणार्‍या सार्क परिषदेला हजर राहण्याचं निमंत्रण दिलं. हे निमंत्रण मोदींनी स्वीकारलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी म्हणजेच 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाणार आहेत. आज रशियामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीनंतर याबाबतची माहिती देण्यात आली. तसंच मुंबई हल्ल्यासंदर्भात आपण सहकार्य करु असं आश्वासनही पाकिस्तानने दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची बहुचर्चित भेट आज रशियाच्या उफा शहरात ही भेट पार पडली. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी हे दोन्ही नेते रशियात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतानं घेतलेल्या पुढाकारानंतर ही बैठक पार पडली. भेटीची नियोजित वेळ आधी 45 मिनिटांची होती. ती 15 मिनिटांनी वाढवण्यात आली. याआधी महिन्यांपूर्वी काठमांडूमध्ये मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात भेट झाली होती. मात्र कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. मोदींच्या शपथग्रहण समारंभालाही शरीफ यांनी हजेरी लावलेली होती. मात्र त्यातून फारसं काही साध्य झालं नव्हतं.

दोन्ही देशांतली चर्चा पुढे न्यायची असेल तर विश्वास दृढ करायला हवा, असं मोदींनी शरीफ यांना सांगितलं. तर शरीफनी काश्मीरबाबतसुद्धा चर्चा होणं गरजेचं असल्याचं म्हटलं. सध्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वीच्या सुटकेवरुन आणि बांगलादेशच्या दौर्‍यात मोदींनी केलेलं वक्तव्य यावरुन दोघांमधले संबंध ताणलेले आहेत. तसंच 26/11 हल्ल्याच्या खटल्यातल्या धीमी प्रगती, सीमेवरचा गोळीबार यासारख्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. द्विपक्षीय चर्चेसाठी दिल्लीत दोन्ही देशांमध्ये सचिवस्तरावर बैठक घेण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. तसंच, या भेटीत मोदी आणि शरीफ यांच्यात दोन्ही देशांच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मोदी-शरीफ भेट

  • मोदींनी हे मुद्दे मांडले

- चर्चा पुढे नेण्यापूर्वी दोन्ही देशांत विश्वासाचं नातं निर्माण होणं

- 26/11खटल्यातल्या धीम्या प्रगतीचा मुद्दा

- सीमेवर वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी भंगाचा मुद्दा

- दहशतवादाबद्दल पाकिस्ताननं केवळ बोलू नये, कारवाई करावी

  • शरीफनी हे मुद्दे मांडले

- पाकिस्तानमधून दहशतवादाचा खात्मा करण्याचा निश्चय

- दहशतवादी संघटनांवर देशाच्या कायद्यानुसार बंदी घालणार

- काश्मीरप्रश्नीही चर्चा व्हावी

Follow @ibnlokmattv

First published: July 10, 2015, 1:07 PM IST

ताज्या बातम्या