मुंबईत सर्व प्रकारच्या ड्रोन उडवण्यावर बंदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2015 07:32 PM IST

मुंबईत सर्व प्रकारच्या ड्रोन उडवण्यावर बंदी

drone in mumbai408 जुलै : मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या ड्रोन उडवण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाणारे ड्रोन उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सीआरपी कलम 144 नुसार आदेश बजावण्यात आले आहेत.

दहशतवादी मुंबईत पॅराग्लाईडर आणि ड्रोनचा वापर करुन हल्ला करू शकतात अशी भीती असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारी मुंबईमधल्या भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर अर्थात BARC आणि टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात 'टीस'वर एक ड्रोन आढळलं होतं. हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटचा एक कर्मचारी हे ड्रोन उडवत होता. टीसच्या एका प्राचार्यांनी हे पाहिलं, आपल्या मोबाईलवर त्याचं रेकॉर्डिंग करून पोलिसांकडे दिलं होतं. यानंतरच मुंबई पोलिसांनी आज हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2015 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...