पावसाळ्यातच पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्रात 7 संच बंद

पावसाळ्यातच पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्रात 7 संच बंद

  • Share this:

vlcsnap-2015-07-08-16h19m03s3708 जुलै : राज्याला 1170 मेगावॅट वीज पुरवठा करणार्‍या परळी औष्णिक केंद्रातील 7 संच हे पाण्याअभावी बंद करावे लागले आहेत. ऐन पावसाळ्यात औष्णिक केंद्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या केंद्राला पाणी पुरवठा करणार्‍या खडका तलावात पाणी साठा हा पूर्णपणे संपला असून त्यामुळे वीज निर्मिती होऊ शकत नसल्याचं औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता व्ही.एस. चौधरी यांनी सांगितलं.

हे वीज केंद्र बंद पडल्यानं राज्यात 1170 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण होणार आहे. दरम्यान, हे वीज निर्मिती केंद्र पुन्हा सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. मागील आठवड्यापासून या केंद्रातील 3 संच हे बंद करण्यात आले होते. मंगळवारी सातवा संच हा देखील बंद करण्यात आल्याचं चौधरी यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: July 8, 2015, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading