तुर्की विमानात 'तो' अफवाचा बॉम्ब

तुर्की विमानात 'तो' अफवाचा बॉम्ब

  • Share this:

turkey airlines07 जुलै :: दिल्लीच्या आईजीआई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेल्या तुर्की एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची घटना ही अफवाच निघालीये. अग्नीशमन दल आणि सुरक्षा अधिकार्‍यांनी विमानाची तपासणी केला असता विमानात बॉम्ब नसल्याचं निष्पन्न झालं. विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीमुळे तुर्कीचं विमान दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँड करण्यात आलं होतं.

तुर्की एअरलाईन्सचं TK - 65 हे विमान बँकॉकहून इस्तांबुलकडे जात होतं. या विमानात 148 प्रवाशी होते. बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच या विमानाचं तातडीने दिल्ली विमानतळावर दुपारी 1 वाजून 41 मिनिटांनी लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवाशी आणि कर्मचार्‍यांना उतरवण्यात आलंय. विमानाला वेगळ्या जागेवर नेण्यात आलं होतं. एनएसजी सह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर एनएसजीचं पथक दिल्ली विमानतळावर दाखल झालं. विमानात बॉम्ब सापडल्याची माहिती वैमानिकानं एटीएसला दिल्याचं सीएसआयएफकडून सांगण्यात आलं. बाथरुमच्या काचेवर धमकीचा संदेश लिहील्याची विमान कर्मचार्‍यांची माहिती होती. दिल्ली विमानतळावर इमर्जन्सीही जाहीर करण्यात आली होती.

सुरुवातीला विमानाच्या पायलटने नागपूर विमानतळाच्या एटीसीशी संपर्क साधला होता आणि विमान उतरवण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, नागपूरच्या एटीसीने परवानगी दिली नाही. त्यांनी पायलटला दिल्ली एटीसीशी संपर्क करावा अशी सुचना केली. त्यानंतर तुर्की एअरलाईन्सच्या पायलटने दिल्ली विमानतळाकडे विमान वळवलं.

नागरीक उड्‌ड्यान राज्यमंत्री महेश शर्मा यांना सांगितलं की, एनएसजी आणि बॉम्ब नाशक पथकाने विमानाची तपासणी केली असता कोणतीही स्फोटक वस्तू सापडली नाही. कार्गोमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती पण, तिथेही काहीही सापडलं नाही. तीन तास चालेल्या या अफवानाट्यानंतर विमानतळावरची इमर्जन्सी हटवण्यात आली. पण, हा खोडसाळपणा कुणी केला आणि यामागे काय उद्देश होता याचा शोध घेतला जात आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 7, 2015, 5:05 PM IST

ताज्या बातम्या