अंगठी, गाडी दिली नाही म्हणून विवाहितेला पेटवलं

अंगठी, गाडी दिली नाही म्हणून विवाहितेला पेटवलं

  • Share this:

aruaehurheuay

07 जुलै : आंधळ्या परंपरांचा आजही बळी ठरतायेत निष्पाप महिलाच... अशीच संताप आणणारी दौंडमधल्या वरवंड इथे घटना घडली आहे. परंपरेप्रमाणे अधिक महिन्यात जावयाचा मान केला जातो. पण याच धोंडे जेवणात अंगठी, गाडी दिली नाही म्हणून उच्चशिक्षित विवाहीत तरुणीला पेटवून देण्यात आलं आहे. यात 85 टक्के भाजली आहे. यात तिचा नवरा आणि सासूला अटक करण्यात आली आहे. पण धक्कादायक म्हणजे तिचं तान्हं बाळ बेपत्ता असून सासरा फरार आहे.

धनश्री दिवेकर असं या विवाहीत तरुणीचं नाव आहे. ती बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये लेक्चरर आहे. पण केवळ मागण्या पूर्ण केल्या नाहीत म्हणून तिला अंगावर रॉकेल टाकून पेटवण्यात आलं. यात धनश्री 85 टक्के भाजली आहे. पुण्याच्या सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिची मृत्युशी झुंज सुरू आहे. बाळ कुठे आहे याची अजून काहीही माहिती नसल्याचं धनश्रीच्या वडिलांनी सांगितलं आहे. धनश्री उच्चशिक्षित होती पण तिचा नवरा रोहन मात्र काहीही काम करत नव्हता. त्याची डिग्रीही बोगस असल्याचीही माहिती कळतीये.

Follow @ibnlokmattv

First published: July 7, 2015, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading