Elec-widget

..अजूनही 'या' गावात शाळा नाही, मुलं शिकतात समाज मंदिरात !

..अजूनही 'या' गावात शाळा नाही, मुलं शिकतात समाज मंदिरात !

  • Share this:

palghar school406 जुलै : नुकतंच राज्यभरात शाळाबाह्य मुलांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. त्यावरून बरीच चर्चा आणि वादविवादही झाले. पण, पालघर तालुक्यातील मेंढवन गावातल्या सर्वच्या सर्व मुलांना शाळाबह्य दाखवण्यात आलं. याचं कारण म्हणजे मेंढवन गावात शाळाच नाहीये.

मेंढवन हे 100 टक्के आदिवासी गाव आहे. 5 वर्षांपूर्वी मेंढवन या गावातील आश्रम शाळेत 2 मुलांचा सर्प दंशाने मृत्यू झाल्यानं या गावातील आश्रम शाळा खुटल इथं स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून या गावात कुठलीही शाळा नाहीये. सध्या या गावात 6 ते 14 वयोगटातील 148 विद्यार्थी आहेत. याच गावातील 2 सुशिक्षित तरूणी गावातील समाज मंदिराच्या ओट्यावर या विद्यार्थांना शिकवत आहेत. मात्र, या शाळेला कुठलीही मान्यता नाहीये.

या मुलांना कुठलीही प्रमाणपत्रे या शाळेला देता येणार नाहीत. मग या शाळेत शिकणार्‍या मुलांच्या भविष्याचे काय हा प्रश्नच आहे. 4 जुलै रोजीच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेमध्ये या गावातील सर्वच्या सर्व मुलांना शाळाबाह्य दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे हे गाव पूर्णपणे दारिद्रय रेषेखाली आहे. आम्ही अडानी राहिलो आता आमची मुलंही अडानीच राहणार असतील तर आमच्यापुढे मुलाबाळासह आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे या गावातील गरीब आदिवासी सांगतायत.

आम्हाला शिकायचय शिकून मोठं व्हायचय असं निरागस स्वप्न या गावातील आदिवासी मुले बघत आहेत. मात्र शिकन्यासाठी शाळाच नसल्याने या मुलांच्या शिकन्याच्या अन् शिकून मोठं होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरतंय. या गावात मुलांना शिकवणार्‍या एका सुशिक्षित मुलीने सांगितले की, "या गावातील लोक शाळेची अगदी चातका प्रमाणे वाट पाहत असतात. भेटतात तेंव्हा विचारत असतात की, आपल्या गावात आपले मायबाप सरकार शाळा कधी चालू करणार"

मेंढवन गावातील शाळेचा प्रश्न बघणार्‍या कोणालाही "पढ़ेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया" असं म्हणणारं सरकार मेंढवन हे गावही याच इंडियात असल्याचं विसरलं तर नाहीना असा प्रश्न सहज पडतो.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...