राम प्रधान समितीचा अहवाल प्रसिद्ध करा - कविता करकरे

26 नेव्हेंबर 26/11च्या हल्ल्याबाबत राम प्रधान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी शहिद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी केली आहे. 26/11च्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालंय. यानिमित्ताने त्यांच्याशी आयबीएन-लोकमतने खास बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात माझा राग नसून तो व्यवस्थेच्या विरोधात आहे. अधिकार्‍यांनी जबाबदारी न घेण्याचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचंही त्यावेळी नमूद केलं. तसंच पोलीस दलाचं आधुनिकरण झालं पाहिजे, त्यांना चांगल्या दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मेणबत्या पेटवणं हा केवळ दिखावा आहे, त्यापेक्षा पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्र द्यावीत. असे हल्ले होऊ नये म्हणून सरकारने दक्ष रहावं हीच खरी शहिदांना श्रध्दांजली ठरेल असंही त्या म्हणाल्या.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2009 10:36 AM IST

ताज्या बातम्या