ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लवकरच एफआरपी मिळणार - चंद्रकांत पाटील

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लवकरच एफआरपी मिळणार - चंद्रकांत पाटील

  • Share this:

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patil

06 जुलै : एफआरपीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना आता लवकरच एफआरपीनुसार दर मिळण्याची शक्यता आहे. येत्या मंत्रिमंडळच्या बैठकीत केंद्राच्या 1 हजार 950 कोटीच्या मदतीच्या अध्यादेशाचा ठराव मांडू अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रानं जाहीर केलेल्या पॅकेज पैकी राज्याला 1 हजार 950 कोटी वाट्याला आले आहेत. त्यामुळं कारखानदारांनी शेतकर्‍यांना एफआरपी द्यावी, असं आवाहन सहकार मंत्र्यांनी केलं आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी 15 हजार कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले आहेत. आम्ही वारंवार कारखान्यांच्या मागे लागून किंवा त्यांच्यावर नजर ठेवून हे पैसे दिले जातायेत ना याची काळजी घेतली, असंही पाटील म्हणाले. फौजजारी कारवाईची धमकी सातत्यानं देता येत नाही. त्याने कारखाने बंद पडले असते. आम्हाला शेतकर्‍यांना पैसे मिळण्यात रस आहे, कारखाने बंद पाडण्यात नाही, असंही त्यांनी नमूद केलं..

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading