वारीदरम्यान विठुरायांच्या दर्शनासाठी व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत!

वारीदरम्यान विठुरायांच्या दर्शनासाठी व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत!

  • Share this:

Image vitthala_amuli_300x255.jpg06 जुलै : पंढरपूरमध्ये येत्या 27 जुलैला होणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठुरायांचे भक्त सज्ज झाले आहेत. यावर्षीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी खाजगीवाल्यांची पूजा आणि व्हीआयपी भक्तांच्या शॉर्टकट दर्शनाच्या पासेसना कात्री लावली आहे. भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंढे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यंदा भाविकांची वारी आणखी सुखकर होणार आहे.

दरम्यान, आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून दिंड्या आणि पालख्या पंढरी कडे वाटचाल करू लागल्या आहेत. पंढरीत दाखल होणार्‍या वारकर्‍यांना आवश्यक त्या मुलभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर असते. 50हून अधिक शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा यासाठी कामाला लागल्या आहेत. वारीच्या या सोहळ्यासाठी तब्बल 15 लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणा खाली नियोजन करण्यात येत असून सर्व शासकीय यंत्रणा एका छत्राखाली आणून भाविकांना वारी अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रांना जोमाने कामाला लागलेली दिसते. त्याप्रमाणे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 6, 2015, 10:32 AM IST

ताज्या बातम्या