S M L

नाशिक-मुंबई वाहतूक सुरळीत, मालगाडीचे डब्बे हटवण्यात यश

Samruddha Bhambure | Updated On: Jul 6, 2015 02:12 PM IST

नाशिक-मुंबई वाहतूक सुरळीत, मालगाडीचे डब्बे हटवण्यात यश

06 जुलै : इगतपुरीजवळ सोमवारी सकाळी रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डब्बे हटवण्यात यश आलं आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला रेल्वे वाहतूक अखेर सुरळीत सुरू झाली आहे.

आज सकाळी 7:30 वाजता मुंबईहून भुसावळला जाणारी मालगाडी इगतपूरी स्टेशनजवळ रुळावरून घसरल्यामुळे नाशिककडे जाणारी संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नाशिककडे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच इगतपूरीहून मदतीसाठी रेल्वेचे पथक रवाना झाले होते. अखेर या पथकाला घसरलेले डब्बे हटवण्यात यश आले आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 08:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close