'नोकरीवरुन काढून टाकेन', आव्हाडांची पोलीस अधिकार्‍याला धमकी

'नोकरीवरुन काढून टाकेन', आव्हाडांची पोलीस अधिकार्‍याला धमकी

  • Share this:

04 जुलै : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या धडाकेबाज स्टाईल आणि वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असतात. आता तर आव्हाड यांनी एका पोलीस अधिकार्‍याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीच दिली. मुंब्य्रामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चा अडवला म्हणून जितेंद्र आव्हाडांनी थेट अधिकार्‍यांशी हुज्जत घातली आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली.

jitendra awadha_sot2334मदरशांना शाळाबाह्य दर्जा देण्याच्या विरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंब्रा इथं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागील सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि पोलिसांत चांगलीच जुंपली. या वेळी बंदोबस्ताला असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ठाणे पोलीस सहायक आयुक्त महेश कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न केलाय. पण, आव्हाडांचा पारा इतका चढला होता की, तुमची नोकरी घालवून दाखवेन अशी धमकीच दिली. आम्ही शांततेनं आंदोलन करतोय आम्हाला आमचं काम करू द्या, आम्ही कुणाला घाबरत नाही अशी अरेरावीही आव्हाडांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेलीय असं असलं तरीही जितेंद्र आव्हाड यांची वागणूक ही सत्ताधारी असल्यासारखीच असल्याचा आरोप होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 07:09 PM IST

ताज्या बातम्या