पंकजा मुंडे म्हणतात, 'गुणवत्ता राहू द्या, चिक्की पोहोचली ही मोठी गोष्ट'

पंकजा मुंडे म्हणतात, 'गुणवत्ता राहू द्या, चिक्की पोहोचली ही मोठी गोष्ट'

  • Share this:

pankaja on chikki04 जुलै : चिक्की घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडलीये. अंगणवाड्यांना वाटण्यात आलेल्या चिक्कीमध्ये लोखंडाचे तुकडेच आढळून आले आहे. पण, याबद्दल पंकजा मुंडेंना आणखीही गांभीर्य समजल्याचं दिसत नाही. गुणवत्ता राहू द्या, निदान चिक्की पोहोचली हीच मोठी गोष्ट आहे अशी बेफिकिरीची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली.

पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटींचा घोटाळा समोर आल्यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली. पंकजा मुंडेंनी हा घोटाळाच नाही असा दावा करून आपला बचाव केला. पण, अंगणवाडीतल्या मुलांना लोह मिळावं, यासाठी महिला आणि बालकल्याण खात्याने चिक्की पुरवठा सुरू केला. पण या चिक्कीमध्ये आता चक्क लोखंडाचे तुकडे आणि लोखंडाच्या पट्‌ट्या आढळल्या आहेत. अमरावतीतल्या संभू अंगणवाडीत आज चिक्कीमध्ये लोखंडी रिंग सापडली. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी पट्टी सापडली होती. तर अहमदनगरमध्ये वाळू आणि माती मिश्रीत चिक्की सापडली. विशेष म्हणजे ही सर्व चिक्की ही सूर्यकांता सहकारी संस्थेने वितरित केलेली आहे. याच सूर्यकांता संस्थेला 113 कोटींचं चिक्कीचं कंत्राट देण्यावरून विरोधकांना पंकजांवर टीका केली होती. आता, तर चिक्कीच निकृष्ट असल्याचं समोर आलं. यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया जाणून घेतली असता पंक जांनी अजब तर्क लढवला.

आता घोटाळ्याचा वाद गुणवत्तेवर आलाय. याबद्दल मी समाधानी आहे. चांगली गुणवत्ता देणार यासाठी आपण शब्द दिलाय आणि तो पूर्णही करणार. पण, या गुणवत्तेवर आघाडी सरकार संवेदनशील राहिलं असतं तर चांगले निकाल आले असतं असं खापरंच पंकजा मुंडेंनी आघाडी सरकारवर फोडलं. गुणवत्ता राहू द्या पण निदान चिक्की पोहचली तरी. चिक्की पोहचली म्हणून गुणवत्ता समोर आली असं अजब उत्तरच पंकजा मुंडेंनी दिलं. विरोधकांनी या प्रकरणात विनाकरण टीका केली. घोटाळा हा शब्द टाकून विरोधकांनी अधिवेशनापुर्वी लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 06:06 PM IST

ताज्या बातम्या