'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

  • Share this:

mard doctor strike

03 जुलै : राज्यात विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर आज (शुक्रवारी) संध्याकाळी मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या जवळपास 90 टक्के मागण्या राज्य सरकारने मान्य करून त्याबाबतचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

वेतनवाढ, सुरक्षा व्यवस्था, रजा आदी मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी कालपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाचा आज दुसरा दिवस होता. संपामुळे कालपासून सरकारी हॉस्पिटलमधील पेशंटचे हाल झाले. दरम्यान, केईएम हॉस्पिटलमध्ये सहा महिन्याचं चिमुरड्यावर या संपामुळे उपाचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

मार्डच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्यांच्या 99 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल (गुरुवारी) केलं होतं. पण या सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असं मार्डच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.

Follow @ibnlokmattv

First published: July 3, 2015, 8:57 PM IST

ताज्या बातम्या