हेमा मालिनींच्या कारला अपघात, चिमुरडीचा मृत्यू

हेमा मालिनींच्या कारला अपघात, चिमुरडीचा मृत्यू

  • Share this:

hema malini403 जुलै : अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या मर्सिडीज गाडीला गुरुवारी राजस्थानातल्या दौसामध्ये अपघात झाला. हेमा मालिनी यांची मर्सिडीज गाडी समोरून येणार्‍या अल्टो गाडीला धडकली. या अपघातात एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर चौघं गंभीर जखमी झाले.

हेमा मालिनी यांच्या डोक्याला आणि पाठीला मार लागलाय. रविवारी रात्रीपासून त्यांचं तिनदा सीटी स्कॅन करण्यात आलंय, पण सुदैवानं सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आणि हेमा यांच्या जीवाला कोणताही धोका नाहीये असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्यावर जयपुरमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 3, 2015, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading