माटुंगा-किंग्ज सर्कलजवळ झालेल्याम अपघातामुळे ट्रॅफिक जॅम

माटुंगा-किंग्ज सर्कलजवळ झालेल्याम अपघातामुळे ट्रॅफिक जॅम

  • Share this:

bus accident

02 जुलै : माटुंगा-किंग्ज सर्कलजवळ असलेल्या मोठ्या लोखंडी कमानीला आज (बुधवारी) सकाळी एका डंम्परने धडक दिली. या धडकेत ही कमान मागून येणार्‍या बेस्ट बसवर पडली. या अपघातात बेस्टचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. ड्रायव्हरला जवळच्याच सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. डंम्पर ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर मांटुगा पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू आहे.

या सर्व प्रकारामुळे शीव-माटुंगा- किंग्ज सर्कल परिसरात वाहतुकीचा राडा झाला आणि ऑफिसला जाण्याच्या वेळेलाच मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 3:59 PM IST

ताज्या बातम्या