दहीहंडीत थरांचा थरार 20 फुटांपर्यंतच !

  • Share this:

govinda_vs_court02 जुलै : थरांचा 'थरार' करण्यासाठी गोविंदांनी 35 फूटापर्यंत परवानगी द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाच्या मागणीची 'हंडी'च फोडलीये. त्यामुळं यंदा फक्त 20 फुटापर्यंतचेच थर लावता येणार आहे. तसंच न्यायालयाने यंदाही लहान मुलांना सहभागी होण्यास मज्जाव घातलाय.

दहीहंडीची उंची 35 फूट करावी आणि 18 वर्षांखालील मुलामुलींना यात सहभाग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळं सप्टेंबर महिन्यात होणार्‍या दहीहंडीत सर्व पथकांना 20 फूटापर्यंतचेच थर लावावे लागणार आहेत आणि मुलांनाही त्यात सहभागी होता येणार नाही. मागच्या वर्षी दहीहंडीच्या वेळी न्यायालयानं निर्बंध घातल्यानं काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात जावून स्थगिती मिळवली होती. गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट द्यावे; थरांखाली जाड गाद्या ठेवाव्यात, कार्यक्रम स्थळी प्रथमोपचार पेटी ठेवावी असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading