निवासी डॉक्टर संपावर, रुग्णं वार्‍यावर

निवासी डॉक्टर संपावर, रुग्णं वार्‍यावर

  • Share this:

mard doctor strike02 जुलै : बुधवारी आंतराष्ट्रीय डॉक्टर डे साजरा झाला आणि दुसर्‍याच दिवशी राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टरांची मार्ड ही संघटना आज (गुरुवारी) सकाळी 8 वाजेपासून बेमुदत संपावर गेलीये. त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे.

अपुरा पगार, जादा तास काम, आजारपणाची रजा, सुरक्षा व्यवस्था आदी मागण्यासाठी निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. राज्यभरातील 17 मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहे. हा संप टाळता यावा यासाठी बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मार्डमध्ये बैठक झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडेंसोबत दोन तास चर्चा झाली. मात्र या चर्चेतून काहीही निष्पण झालं नाही. या बैठकीत चर्चा निष्फळ ठरल्यानं मार्ड आंदोलनावर ठाम राहिली. मागण्यांचं परिपत्रक काढल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं मार्डनं स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 9:59 AM IST

ताज्या बातम्या